Ad will apear here
Next
होमो डेअस भाग - १७
होमो डेअस १७   
  
    आधुनिकता हा मानवाने केलेला एक सौदाआहे .ज्या दिवशी आपण जन्माला आलो तेव्हाच आपण या करारावर सही केलेली आहे .अगदी आपल्या मृत्यूपर्यंत आपले आयुष्य त्या कराराशी बांधील राहणार आहे .आपल्या पैकी फार थोड्या लोकांना या हा करार संपुष्टात आणता येईल . किंवा त्यांच्या पलीकडे जाता येईल . आपल्याला मिळणारे अन्न ,आपल्या नोकऱ्या आणि आपली स्वप्न हे सारेच या करारानुसार ठरत असते . आपण कुठे राहणार ' आपण कोणावर प्रेम करणार ' आणि आपण कसं मरणार हेसुद्धा हा करार ठरवत असतो .          

        आपण इंटरनेटवरून एखादं सॉफ्टवेअर डाऊनलोड करून घेतो . त्यात पानंच्या पानं एक गुंतागुंतीचा कायदेशीर करार असतो .आपण त्याकडे एक नजर टाकतो .त्यातल्या शेवटच्या पानावर जातो . आणि आय ऍग्री च्या बाजूला टीक करून त्याबद्दल विसरूनही जातो . आधुनिकता हे अगदी असंच सोप्या करारा  सारखा आहे . या संपूर्ण कराराचा सारांश एका वाक्यात सांगता येऊ शकतो .माणसं सत्ता व सामर्थ्य मिळवण्यासाठी अर्थपूर्ण गोष्टी सोडून द्यायला तयार होत असतात .        

       आधुनिक युग येण्याआधी बहुतांश संस्कृतीमध्ये माणूस एका मोठ्या वैश्विक योजनेचा भाग आहे असा विश्वास होता . ही सत्ता देवांनी बनवलेली होती . निसर्गाच्या न मोडता येणाऱ्या नियमांनी बनवलेली होती . माणसं रंगमंचावरच्या नटा सारखी होती . त्यांना पुरवलेल्या स्क्रिप्ट मधूनच त्यांच्या प्रत्येक शब्दाला 'अश्रूला आणि हालचालींना अर्थ प्राप्त होत होता .      

        आधुनिक संस्कृतीमध्ये अशा मोठ्या वैश्विक योजनेलाच मुळात नाकारल जातं . आपण कोणत्याही भव्यदिव्य नाटकातले पात्र नाही 'आपल्या आयुष्याला कोणतीही निश्चित आखलेली संहिता नाही की तिला कोणी लेखक दिग्दर्शक आणि निर्माते नाहीत . आपल्या वैज्ञानिक समजुतीनुसार विश्व एक आंधळी आणि उद्देशहीन प्रक्रिया आहे . आपल्या या छोट्याशा ग्रहावरच्या अति छोट्या वास्तव्यात आपण चिंता करत बसतो . किंवा या ना त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो . आणि मग त्यातून पुढे काहीच निष्पन्न होत नाही .आधुनिक जगाचा कोणत्या उद्देशावर  विश्वास नाही . केवळ गोष्टीच्या कारणावरच विश्वास आहे .जर आधुनिकतेचं काही बोधवाक्य असेल ' तर ते ' गोष्टी घडतात , इतकच असेल .आपल्या स्वतःच्या आज्ञा खेरीज आपल्याला कोणतीही मर्यादा नाही .

       साथीचे रोग आणि दुष्काळ यांना वैश्विक पातळीवरचे कोणतेही अर्थ नाहीत . आपण ते समूळ नष्ट करू शकतो .चांगल्या भविष्यासाठी युद्ध ही आवश्यक गोष्ट नाही आपण शांतता राखू शकतो . मृत्यूनंतर आपल्याला कोणताही स्वर्ग मिळणार नाही पण आपण पृथ्वीवर स्वर्ग तयार करू शकतो . आणि जर काही तांत्रिक अडथळ्यांवर मात केली तर तिथं कायम राहू शकतो . जर आपण संशोधनामध्ये पैसा गुंतवला तर विज्ञानातल्या नव्या नव्या शोधांमुळे तंत्रज्ञानातल्या प्रगतीला वेग येईल . त्यातून आर्थिक वाढ होईल . अर्थव्यवस्था सुधारली तर अन्न ' अधिक वेगवान वाहने अधिक  औषध यांचा फायदा  आपण घेऊ शकतो . अशाप्रकारे आधुनिकतेच्या या सौद्यामध्ये माणसासमोर प्रचंड मोह पाडणाऱ्या गोष्टी उभ्या आहेत . आणि त्याच बरोबर भयानक परिस्थिती सुद्धा ! पण ज्या विश्वाला काही अर्थ नाही अशा विश्वात पायाखाली मात्र संपूर्ण रिकामपणाची प्रचंड खोल तरीदेखील आहे .

       आधुनिक संस्कृती ही आजवरच्या विश्वात सर्वात शक्तिशाली आहे ' त्याच वेळी अन्य कुठल्याही यापूर्वी झालेल्या संस्कृतीपेक्षा तिच्या मध्ये अस्तित्वाबद्दलची भीती सर्वात जास्त आहे . 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SXRCCP
Similar Posts
होमो डेअस - भाग ३ युआल नोआ हरारी यांच्या होमो डेअस पुस्तकाचा क्रमशः परिचय
होमो डेअस - भाग १० युआल नोआ हरारी यांच्या होमो डेअस पुस्तकाचा क्रमशः परिचय
होमो डेअस भाग -८ होमो डेअस पुस्तकाचा क्रमशः परिचय लेखक युआल नोआ हरारी
युआल नोआ हरारी यांच्या होमो डेअस पुस्तकाचा परिचय - भाग १ युवाल नोआ हरारी सेपियन्स या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक यांच्या होमो डेअस मानवजातीच्या भविष्याचा रोमांचक वेध अनुवाद सुश्रुत कुलकर्णी मधुष्री पब्लिकेशन या पुस्तकाचा तीस भागांतून करून दिलेला सारांशाने परिचय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language